रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 13 ऑगस्ट 2019 (16:54 IST)

'सेक्रेड गेम' मध्ये अमेय वाघ

बहुचर्चित 'सेक्रेड गेम्स' वेब सीरिजचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. 'सेक्रेड गेम्स'च्या पुढच्या सीझनमध्ये कोण कलाकार असतील हे जाहीर करण्यात आलं असून, यात आपला लाडका अभिनेता अमेय वाघ दिसणार आहे.
 
'फास्टर फेणे' मध्ये हेर, तर 'मुरांबा' आणि 'गर्लफ्रेंड' मध्ये प्रियकराच्या भुमिका केल्यानंतर, अमेय वाघ थेट हिंदीच्या या गाजलेल्या वेबसिरीजमध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'सेक्रेड गेम्स'चा पहिला भाग प्रदर्शित झाल्यांनतर अमेयनं तो एका बैठकीतच संपूर्ण बघितला होता. अशा वेब सीरिजमध्ये काम करायला मिळावं असं तेव्हा त्याला वाटलं होतं. त्याचं हे स्वप्न आता पूर्ण झालं आहे.
 
आपल्या भूमिकेविषयी बोलताना अमेय सांगतो, "मी काही ऑडिशन दिल्या आणि माझी एका भूमिकेसाठी निवड झाली. माझा ट्रॅक दिग्दर्शक नीरज घेवान यांनी दिग्दर्शित केलाय. त्यांनी यापूर्वी दिग्दर्शित केलेल्या 'मसान' या सिनेमाचा मी फॅन आहे. त्यामुळे अशा दिग्दर्शकाबरोबर काम केल्याचं एक नट म्हणून खूप समाधान मिळतंय. 'सेक्रेड...'मधल्या भूमिकेविषयी सध्या फार काही सांगता येणार नाही. पण, आजवर मी साकारलेली नाही अशा व्यक्तिरेखेत मी असेन. ती व्यक्तिरेखा काहीशी खलनायकी धाटणीची आहे.'