गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 10 ऑगस्ट 2019 (13:22 IST)

अभिनेत्री विद्या सिन्हा यांची प्रकृती गंभीर

Twitter
बॉलिवूडला 80 च्या दशकात उत्कृष्ट चित्रपट देणाऱ्या अभिनेत्री विद्या सिन्हा यांची प्रकृती ढासळली आहे. त्यांना मुंबईतील जुहू येथील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विद्या यांना दोन-तीन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना सध्या आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्या 72 वर्षांच्या आहेत.
 
विद्या यांना रुग्णालयात बुधवारी दाखल करण्यात आले, तेव्हापासूनच त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या तब्येतीत काहीशा सुधारणा असल्याच्या दिसून आल्या होत्या. मात्र अद्याप त्यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हेंटिलेटर काढल्यानंतर त्यांना श्वासोच्छवास करायला त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवरच ठेवण्यात आले आहे.