शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017 (10:32 IST)

काही महिन्यांच्या ब्रेकनंतर पुन्हा तुमच्या भेटीला येईल : बिग बी

अमिताभ बच्चन यांच्या भारदस्त आवाजाने ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचे ९ सिझन झाले आहेत. याच शोच्या ९व्या सिझनच्या शेवटच्या भागाचे शुटिंग नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षीचा ‘केबीसी’ सिझनची आता सांगता होणार आहे. ‘शेवटच्या भागाचे शुटिंग पुर्ण’ असे ट्विट बिग बींनी केले आहे.

केबीसीच्या ९ सिझन बद्दल अभिताभ यांनी एक ब्लॉग देखील लिहीला आहे. ब्लॉगमध्ये ते लिहितात, ‘केबीसी’च्या या सिझनची सांगता झाल्याने सर्वच लोक दु:खी आहेत. गेल्या महिन्यापासून जास्त बोलल्यामुळे माझे टॉन्सेन्स दुखत होते. त्याचा त्रास इतका वाढला की मला काहीही खायला प्यायला त्रास होत आहे. अँटीबायोटिक आणि पेनकिलरच्या गोळ्यांमुळे मी ‘केबीसी’च्या शेवटच्या भागाचे शुटिंग पुर्ण करू शकलो’. ब्लॉगमध्ये बिग बींनी चाहत्यांना एक गुडन्यूजही दिली आहे. काही महिन्यांच्या ब्रेकनंतर शो पुन्हा तुमच्या भेटीला येईल, असेही बिग बींनी म्हटले आहे.