गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017 (10:14 IST)

सिनेमागृहात राष्ट्रगीता वेळी उभे राहणे गरजेचे नाही

देशभक्ती सिद्ध करण्यासाठी तुम्हाला सिनेमागृहात राष्ट्रगीताच्या वेळी उभं राहणं गरजेचं नाही, असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं आहे. तसंच केंद्र सरकारनं सिनेमागृहात राष्ट्रगीत वाजवण्यासंदर्भातील नियमात बदल करता येतील की नाही अशी विचारणा केली आहे.

“सिनेमागृहात राष्ट्रगीत वाजवण्यासंदर्भात नियमावली तयार करणं सरकाचं काम आहे. सरकारने ठरवलं, तर ते असे नियम तयार करु शकतात.” असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे

केरळ फिल्म सोसायटीने सुप्रीम कोर्टाला सिनेमागृहातील राष्ट्रगीतासंदर्भातील आपला आदेश मागे घेण्याची विनंती केली होती. याचिकाकर्त्यांनी यामध्ये सिनेमागृह हे मनोरंजनाचं ठिकाण असल्याचं सांगून, या निर्णयाचा विरोध केला होता. यावर न्यायमूर्ती डी.वाय चंद्रचूड यांनी सहमती दर्शवली आहे.