सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 18 ऑक्टोबर 2017 (14:37 IST)

डोनाल्ड ट्रम्प यांनी साजरी केली दिवाळी

डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये दिवाळी साजरी केली. या वेळी संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या प्रतिनिधी निक्की हेली, अॅडमिनिस्ट्रेटर ऑफ सेंटर्स फॉर मेडिककेअर सीमा वर्मा यांच्यासह अनेक अधिकारी सामील झाले. याशिवाय ओव्हर ऑफिसमध्ये झालेल्या दिवाळी सेलिब्रेशनमध्ये चेअरमन ऑफ द यूएस फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनचे अजित पै, प्रिन्सिपल डेप्युटी प्रेस सेक्रेटरी राज शहाही सामील झाले. ट्रम्प यांची मुलगी इव्हान्काही या कार्यक्रमात सामील झाली. मागच्या वर्षी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान इव्हांका यांनी व्हर्जिनिया आणि फ्लोरिडातील मंदिरांत दिवाळी साजरी केली. गतवर्षी ट्रम्प यांनी न्यू जर्सीमध्ये भारतीय-अमेरिकी समुदायाच्या एका कार्यक्रमात दिवेही प्रकाशित केले होते.