अमिताभ दयाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
चित्रपटसृष्टीतून नुकतीच एक वाईट बातमी समोर आली आहे. दिवंगत अभिनेते ओम पुरी यांच्यासोबत 'कागर : लाइफ ऑन द एज' सारख्या चित्रपटात काम करणारे अभिनेते अमिताभ दयाल यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ गेल्या 13 दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल होते. उपचारादरम्यान 2 फेब्रुवारी रोजी पहाटे 4.30 वाजता त्यांचा मृत्यू झाला.
कामाच्या आघाडीवर, अमिताभ दयाल 'कागर: लाइफ ऑन द एज', रंगदारी (2012) आणि धूम (2013) सारख्या चित्रपटांमध्ये दिसले आहेत.