'परी' चा टीझर रिलीज
अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन 'परी' सिनेमाचा टीझर शेअर केला आहे. 18 सेकंदाचा हा टीझर पाहून रोमांच उभे राहितात. 'परी' येत्या 2 मार्चला होळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.
'परी' हा भयपट असून अनुष्काच्या होम प्रॉडक्शनअंतर्गत ह्या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. NH10 आणि फिल्लौरीनंतर 'परी' हा अनुष्का शर्माच्या होम प्रॉडक्शनचा तिसरा चित्रपट आहे. 'परी' हा शब्द उच्चारल्यावर आपल्या मनात आणि डोळ्यासमोर सुंदर परीचं चित्र समोर येतं, पण ही 'परी' थोडी भयानक आहे.