शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 11 नोव्हेंबर 2018 (00:32 IST)

बाहुबली मध्ये मराठी तारका राजमाता शिवगामी ‘बाहुबली : बिफोर द बिगनिंग’ वेब सिरीज

बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ या दोन्ही चित्रपटांच्या यशानंतर आता यावरील वेब सीरिज नेटफ्लिक्स प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. या नवीन  वेब सीरिजमध्ये माहिश्मती साम्राज्याच्या राजमाता शिवगामी यांची कथा असून, ‘बाहुबली : बिफोर द बिगनिंग’ असं या सीरिजचं नाव असणार आहे. कोणकोणते कलाकार काम करणार याची माहिती उघड झाली आहे. या प्रिक्वल सीरिजमध्ये मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर शिवगामीची भूमिका साकारणार आहे. अभिनेता राहुल बोस स्कंददासाच्या भूमिकेत आहे. ‘बाहुबली : द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या दोन्ही चित्रपटांत अभिनेत्री रम्या कृष्णा यांनी शिवगामीची भूमिका साकारली होती. वेब सीरिजमध्ये मृणाल ठाकूर, राहुल बोस यांच्यासोबतच अतुल कुलकर्णी, वकार शेख, मील खान, सिद्धार्थ अरोरा आणि अनुप सोनी यांच्याही भूमिका आहेत.