गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जून 2018 (10:50 IST)

बिपाशा-करण पुन्हा रुपेरी पडावर एकत्र

बिपाशा बसू व तिचा पती करण सिंग ग्रोव्हर पुन्हा एकदा एकत्र मोठ्या पडद्यावर काम करणार असल्याची चर्चा बर्‍याच काळापासून सुरू होती. खरे तर त्यानंतर याबाबत काहीच खबर नव्हती, परंतु त्या चित्रपटात नसले, तरी दुसर्‍या एका चित्रपटामध्ये मात्र हे दोघेही एकत्र दिसून येणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. गायक मिका सिंग एक फिल्म प्रोड्यूस करत आहेत, ज्यामध्ये लीड अ‍ॅक्ट्रेसच्या रूपात बिपाशा बसू आहे. बिप्स या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. तिने लग्नानंतर आजपावेतो कोणताही चित्रपट केला नव्हता. या चित्रपटासाठी करण सिंग ग्रोव्हरलाच मेल लीड म्हणून निवडण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या चित्रपटाचे टायटल आदत असून, या चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये काही बदल करून करणची भूमिका तयार करण्यात येणार आहे. या जोडीचे फॅन फॉलोइंग खूप मोठे असल्याने या चित्रपटामध्ये दोघांना एकत्र आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोघांचा विवाहानंतरचा हा पहिलाच एकत्र असलेला सिनेमा आहे.