शनिवार, 23 सप्टेंबर 2023
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 ऑगस्ट 2022 (08:01 IST)

छोरी 2 : नोव्हेंबरपासून सुरू होणार चित्रिकरण

नुसरत भरुचाचा चित्रपट ‘छोरी’च्या सीक्वेलच्या चित्रिकरणास नोव्हेंबर महिन्यात सुरुवात होणार आहे. चित्रपटात काही नवे चेहरे दिसून येतील असे समजते. ‘छोरी 2’ चित्रपटाची कहाणी पहिल्या भागाचा उत्तरार्ध दर्शविणारी असेल. नुसरतसह पहिल्या चित्रपटातील काही कलाकार सीक्वेलमध्येही दिसून येणार आहेत. विशाल हे नव्या चित्रपटाची कहाणी लिहित आहेत.
 
‘छोरी 2’ हा चित्रपट पहिल्या भागापेक्षा अधिक व्यापक स्तरावर निर्माण केला जणार आहे. निर्माते अबुदंतिया एंटरटेनमेंट, टी-सीरिज आणि हॉलिवूड क्रिएटिव्ह स्टुडिओ क्रिप्ट टीव्ही छोरी चित्रपटासह भारतातील पहिली हॉरर प्रँचाइजी निर्माण होण्याची अपेक्षा करत आहेत. क्रिप्ट टीव्ही देखील प्रोस्थेटिक्स आणि अन्य इफेक्ट्सच्या मदतीने ‘छोरी 2’च्या लुकला डिझाइन करणार आहे. या चित्रपटाचे अनेक शहरांमध्ये चित्रिकरण केले जाणार आहे.