शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 डिसेंबर 2017 (15:50 IST)

हिंदीतील सैराट अर्थात धडक चे शुटींग सुरु फोटो व्हायरल

शाहीद कपूरचा भाऊ इशान खट्टर आणि श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर मराठी सुपर हिट सैराट चित्रपटाच्या रिमेक  ‘धडक’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. या चित्रपटाचे  जान्हवी आणि इशानने शूटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटाचे फोटो प्रसिद्ध झाले असून व्ह्याराल होते आहेत. सकाळी चित्रपटाचा पहिला शॉट चित्रीत करण्यात आला आहे. पहिल्या फोटोमध्ये इशान आणि जान्हवी समुद्रकिनारी बसलेले दिसत असून त्यांच्या हातात ‘धडक’चा बोर्डही आहे.

 सिनेमाचं दिग्दर्शन शशांक खेतान करत असून करण जोहर  ‘धडक’चा निर्माता आहे. नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ चित्रपटाचा हिंदी रिमेक धडक सिनेमा असणार आहे. जान्हवी कपूर आर्ची तर इशान खट्टर परशाची भूमिका साकारट आहेत.  ‘सैराट’ चित्रपटाची कथा महाराष्ट्रात घडली होती, मात्र ‘धडक’ची कहाणी राजस्थानात घडताना दिसणार आहे.आर्चीच्या आईची व्यक्तिरेखा जान्हवीची  आई म्हणजेच श्रीदेवी साकारणार आहे. चित्रपट पूर्ण होवून हा चित्रपट 6 जुलै, 2018 रोजी प्रदर्शित होणार आहे.