गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 27 जून 2018 (13:32 IST)

'‍मिस्टर इंडिया'च्या रिमेकमध्ये दीपिका

श्रीदेवीची कन्या जान्हवीचे बॉलिवूडध्ये पदार्पण झाले आहे. तिचा पदार्पणाचा 'धडक' लवकरच रिलीज होणार आहे. जान्हवीचा सिनेमा रिलीज होणे हे श्रीदेवीचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. श्रीदेवीचा अखेरचा सिनेमा 'झीरो'देखील लवकरच येतो आहे. अशातच श्रीदेवी आणि अनिल कपूरचा सुपरहिट 'मिस्टर इंडिया'च्या रिमेकचीही तयारी जोरात सुरू झाली आहे. श्रीदेवी जिवंत असतानाच मिस्टर इंडियाचा रिमेक करण्याबाबत चर्चा सुरू झाली होती. आता या रिमेकमध्ये श्रीदेवीचा रोल दीपिका पदुकोणला यायची चर्चा सुरू झाली आहे. 'पद्मावत'नंतर दीपिका अद्याप कोणत्याही सिनेमामध्ये दिसलेली नाही. इरफान खानबरोबर 'सपना दीदी'मध्ये ती काम करणार होती. पण या सिनेमाचे काम सध्या थांबलेले आहे. त्यामुळे दीपिका पुन्हा एकदा एखाद्या बिग बॅनर सिनेमाच्या शोधामध्ये आहे. जर मिस्टर इंडियाच्या रिमेकची चर्चा खरी असेल, तर ही संधी दीपिका गमवणार नाही. बोनी कपूर आणि कंपनीकडून अद्याप या रिमेकबाबत कोणतीही अधिकृतघोषणा केली गेलेली नाही. त्यामुळे इतर कलाकार, डायरेक्शन, म्युझिक आणि विशेष म्हणजे स्पेशल इफेक्टस्‌बाबतची तयारी कशी असेल, हे अद्याप निश्चित समजलेले नाही.