दिग्दर्शक आणि पटकथा लेखकबासू चॅटर्जी यांचे निधन
चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक म्हणून नावाजलेल्या बासू चॅटर्जी (९३) यांचे निधन झाले आहे. वृद्धापकाळानं चॅटर्जी यांचं निधन झाल्याचं सांगण्यात येत आहे.
समांतर सिनेमाला वेगळ्या आणि तितक्याच प्रभावीपणे मांडण्यासाठी चॅटर्जी ओळखते जात होते. किंबहुना येत्या काळातही चित्रपचप्रेमी आणि अभ्यासकांसाठी त्यांचे काही चित्रपच हे आदर्शस्थानी असतील यात शंका नाही. 'छोटी सी बात', 'रजनीगंधा', 'बातों बातों मे', 'एक रुका हुआ फैसला', 'चमेली की शादी' या चित्रपटांसाठी त्यांच्या दिग्दर्शनाला अनेकांचीच दाद मिळाली होती.
चॅटर्जी यांच्या निधनाचं वृत्त कळताच दिग्दर्शकांच्या वर्तुळातून एक आधारस्तंभ हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. हिंदीसोबतच चॅटर्जी यांनी बंगाली कलाविश्वातही महत्त्वपूर्ण योगदान दिलं.