मुंबई अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सुमारे ९:५० वाजता रनवाल टॉवरच्या सी-विंगमधील फ्लॅट क्रमांक १७०२ मध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, फ्लॅटचे मालक शरद अग्रवाल आणि त्यांची पत्नी दिवाळी पूजेनंतर जेवायला बाहेर गेले होते. त्यांचे वृद्ध आई-वडील आणि घरगुती मदतनीस घरी उपस्थित होते. दिवाणखान्यात पूजेसाठी लावलेल्या दिव्यामुळे अचानक आग लागली.