Dharma Sangrah

एक महिन्यापूर्वीच झाली 'गोलमाल अगेन' चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात

गुरूवार, 5 ऑक्टोबर 2017 (15:02 IST)
गोलमाल सिरीजचा आगामी सिनेमा 'गोलमाल अगेन' च्या पूर्वप्रसिद्धीला चांगलाच चेव फुटला आहे. गेल्या आठवड्यात सोशल नेट्वर्किंग साईटवर प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या ट्रेलरने इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाचा ट्रेलर २४ तासांपेक्षा कमी वेळात २० दशलक्ष प्रेक्षकांनी पाहिला असल्याचा विक्रम या चित्रपटाच्या नावे आहे. शिवाय, आता या चित्रपटाची वाढती प्रसिद्धी लक्षात घेता या सिनेमाने प्रदर्शनापूर्वी आणखीन एक विक्रम केला आहे. प्रेक्षकांना पोटधरून हसायला लावणाऱ्या या सिनेमाच्या अॅडव्हान्स तिकीट बुकिंगला एक महिन्यापूर्वीच सुरुवात करण्यात आली आहे. या सिनेमाच्या निर्मात्यांनी पेटीएमशी भागीदारी केली असून, अश्याप्रकारे रिलीजच्या एक महिन्यापूर्वीच होत असलेल्या तिकीट बुकिंगची ही पहिलीच वेळ असल्यामुळे भारतीय चित्रपट इतिहासात 'गोलमाल अगेन' चित्रपटाची नोंद करण्यात आली आहे.   
दिवाळीच्या मुहूर्तावर हास्याची आतषबाजी करण्यास येत असलेल्या या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या भरपूर अपेक्षा आहेत. त्यामुळे संपूर्ण देशभरातील सिनेरसिकांचा या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला प्रचंड उत्साह पाहायला मिळत असून, प्रत्येकजण सिनेमागृहातील आपापली जागा भरून ठेवण्याच्या प्रयत्नांत दिसून येत आहेत. सिनेमाच्या तिकीट बुकिंगबद्दल, रिलायन्स एन्टरटेन्टेन्मेंटचे एसआयओ शिबाशश सरकार असे सांगतात की, "सिनेमाच्या ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आम्ही फ्रॅंचायझीमार्फत येत्या दिवाळीत 'गोलमाल अगेन' चा हास्यस्फोट चाहत्यांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रेक्षकांच्या वाढत्या अपेक्षांमुळे, पेटीएमने आमच्यासोबत सहयोग केला असून, त्यांच्या सहकार्याने प्रथमच आम्ही फिल्म रिलीजच्या चार आठवड्यांपूर्वीच तिकीट बुकिंग उघडण्यास तयार झालो. "
एक महिन्यापूर्वी अॅडव्हान्स बुकिंग उघडणारा पहिला भारतीय चित्रपट असण्याविषयी, 'गोलमाल अगेन' दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी सांगितले की,  "आमचा सिनेमा अश्याप्रकारे लोकांपर्यंत मोठ्याप्रमाणात पोहोचत असल्याचे पाहून आनंद वाटतो आहे. प्रेक्षकदेखील प्रदर्शनापूर्वीच आगाऊ तिकीट विकत घेत आहेत. 'गोलमाल अगेन' ला मिळत असलेल्या उदंड प्रतिसादामुळे मी खुश आहे'. 
पेटीएम अधिकृतरित्या चित्रपटाशी संलग्न झाले असून. त्याअंतर्गत संपूर्ण भारतामध्ये 'गोलमाल अगेन' च्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात करण्यात आली आहे. ज्यात प्रेक्षकांना मूव्ही-फेअर ५०० रुपये किमतीचे व्हाउचर जिंकता येऊ शकते आणि ₹ १०० पर्यंत रोख परतदेखील मिळवता येऊ शकते. तसेच काही ठराविक सिनेमागृह आणि मल्टीप्लेक्समध्येसुद्धा सिनेमाची तिकिटे उपलब्ध करण्यात आली आहेत.

सर्व पहा

अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल'चा विनोदी ट्रेलर प्रदर्शित; चित्रपटात ३० हून अधिक मुख्य आणि सहाय्यक कलाकार

हास्य आणि गावाकडच्या वास्तवाचा अनोखा संगम असलेल्या 'ग्राम चिकित्सालय सीझन २' चा ट्रेलर प्रदर्शित झाला

आमिर खान प्रॉडक्शन्स आणि 'लगान'ला २५ वर्षे पूर्ण आमिर खान भव्य पार्टी देणार, संपूर्ण कलाकार आणि क्रू उपस्थित राहणार

2026 आणि 2027 मध्ये आपल्या पदार्पणासह बॉलिवूडमध्ये एंट्री करणार हे नवे चेहरे

श्रद्धा कपूरच्या नवीन चित्रपट 'ईथा'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

सर्व पहा

सलमान खानने 'काला हिरण - द बॅटल फॉर लेगसी'' चित्रपटाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली

हास्य आणि गावाकडच्या वास्तवाचा अनोखा संगम असलेल्या 'ग्राम चिकित्सालय सीझन २' चा ट्रेलर प्रदर्शित झाला

महाराष्ट्र पोलिसांनी कॉमेडियन प्रणित मोरेवर गुन्हा दाखल केला

अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल'चा विनोदी ट्रेलर प्रदर्शित; चित्रपटात ३० हून अधिक मुख्य आणि सहाय्यक कलाकार

९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेते दिन्यार तिरंदाज यांचे निधन

पुढील लेख
Show comments