शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

'गोलमाल अगेन’चा विक्रीम, 20 मिलियन प्रेक्षकांनी पाहिला ट्रेलर

गोलमाल सीरीजचा आगामी सिनेमा ‘गोलमाल अगेन’ 20 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. मात्र या सिनेमाने रिलीजपूर्वीच नवा विक्रम केला आहे. या सिनेमाचा ट्रेलर एकाच दिवसात 20 मिलियन प्रेक्षकांनी पाहिला. या सिनेमाचा ट्रेंड वर्ल्डवाईड असून सोशल मीडियावर ट्रेलर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे. 

या सिनेमात अजय देवगण, अरशद वारसी, श्रेयस तळपदे, तुषार कपूर, कुणाल खेमू, नील नितीन मुकेश यांची मुख्य भूमिका आहे. तर तब्बू आणि परिणिती चोप्रा या अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसतील.गोलमान अगेन हा हॉरर-कॉमेडी सिनेमा आहे. 2006 साली गोलमाल : फन अनलिमिटेड हा सिनेमा रिलीज झाला होता. त्यानंतर 2008 साली गोलमाल रिटर्न्स हा सिनेमा आला, तर 2010 साली गोलमाल 3 या सिनेमाने प्रेक्षकांना पोट धरून हसवले होते.