Dharma Sangrah
✕

Happy Birthday : किस्से किशोरदांचे (जयंती विशेष)

Updated: शुक्रवार, 4 ऑगस्ट 2023 (10:49 IST)
 
किशोरे कुमार यांचे बालपण मध्य प्रदेशातील खांडवा या शहरात गेले. पुढे करीयरसाठी वयाच्या सतराव्या वर्षी म्हणजे 1946 मध्ये ते मुंबईत गेले. तोपर्यंत त्यांची ओळख अशोक कुमार यांचे भाऊ एवढीच होती. पुढे जाऊन हा मुलगा चित्रपटसृष्टीवर राज्य करेल असे कुणी सांगितले असते तर त्याला वेड्यातच काढले असते. पण ते घडले.
 
चमत्कारीकपणा, विक्षिप्तपणा, मनस्वीपणा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू होते. त्यांच्या या पैलूंचे काही किस्से.
 
कट म्हणताय की कार पुढे नेऊ?- अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, संगीतकार अशी अनेक रूपे किशोर कुमार यांची असली तरी ते मुळात गायक होते. आपल्या हीच खरी ओळख आहे, असे त्यांचे म्हणणे होते. ते अभिनय करत ते केवळ नाईलाज म्हणून. त्यामुळेच कोणताही सीन असो ते तो आपल्या पद्धतीने करत. यामुळे दिग्दर्शक आपल्याला चित्रपटातून काढून टाकेल, असे त्यांना वाटे. पण झाले भलतेच. त्यांच्या या विक्षिप्त करामतीच गाजल्या. एकदा त्यांना एका चित्रपटात कार चालवायची होती. दिग्दर्शकाने सांगितले, कट बोललो की थांबवायची. किशोरने गाडी सुरू केली ती थांबवलीच नाही. युनिटचे लोक घाबरले. हिरो कुठे गेला तेच कळेना. शोधाशोध सुरू झाली. तरीही सापडेना. मग पनवेलहून फोन आला, किशोरकुमार दिग्दर्शकाशी बोलले, कट म्हणताय की कार पुढे नेऊ?
 
अभिनेत्याच्या आवाजात गायन- किशोरकुमारचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या गायकाला ते आवाज देत, त्याच्या आवाजाच्या पोतानुसार ते गात. त्यामुळे आवाज किशोरचा असला तरी ते गाणे देव आनंदवर आहे, की राजेश खन्नावर ते न चटकन कळतं. किशोरच्या गाण्यांचा देव आनंद, राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चनच्या लोकप्रियतेत मोठा वाटा आहे.
 
आणिबाणीत बंदी- आणिबाणी असताना किशोरचे सत्ताधाऱ्यांशी वाजले. संजय गांधी यांनी दिल्लीत सास्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. तेथे गाण्यासाठी त्यांना किशोरदांना निमंत्रण पाठवले. पण तेही मानी. त्यांनी मानधनाची मागणी केली. संजय गांधींना त्यांच्या नावावरच फुली मारली. मग आले संजयच्या मना तेथे कोणाचे चालेना. आकाशवाणी, दूरदर्शनचे दरवाजेही किशोरसाठी बंद झाले. पाच जानेवारी 1977 ला अखेर त्यांचे गाणे आकाशवाणीवर लागले. गाणे होते, दुःखी मन मेरे, सुन मेरा कहना, जहॉं नही चैना वहॉं नहीं रहना.
 
भयपटांची आवड- किशोरदांनी आपल्या घरातील एक खोली खास आपल्या छंदासाठी राखून ठेवली होती. हा छंद होता. भयपट पाहण्याचा. या खोलीत सगळ्या भयपटांच्या कॅसेट्स ठेवल्या होत्या. किशोरदांना मूड असला की ते या खोलीत येत. अंधार करत आणि आपल्याला आवडेल तो चित्रपट पहात बसत. त्यांच्या या विक्षिप्त छंदाचे अनेक किस्से चित्रपटसृष्टीत मशहूर आहेत.
 
चार विवाह- किशोरदांचे वैयक्तिक आयुष्यही त्यांच्या विक्षिप्तपणापासून सुटले नाही. त्यांनी चार लग्न केली. त्यांची पहिली पत्नी रूमादेवी. लग्नानंतर दोन वर्षांनंतर त्यांना मुलगा झाला तो अमित कुमार. त्यानंतर त्यांचे आणि रूमादेवींचे पटले नाही. दोघंही वेगळे झाले. चलती का नाम गाडी चित्रपटाच्या निमित्ताने त्यांचे मधुबालाशी संबंध जुळले.
 
त्यांनी लग्नही केले. नऊ वर्षे हे लग्न टिकले. याच काळात मधुबाला आजारी पडली. किशोरदांनी त्यांची खूप सेवा केली. मधुबालाच्या निधनानंतर सहा वर्षांनी किशोरदांनी 1975 मध्ये योगिता बालीशी लग्न केले. पण काही महिन्यात हे लग्न तुटले. त्यानंतर त्यांनी लीना चंदावरकर यांच्याशी लग्न केले. त्यांच्यापासून त्यांना सुमित कुमार हा मुलगा झाला.

सर्व पहा

माझ्या वैयक्तिक आयुष्याचा तमाशा करू नका," कोमल राणीसोबतच्या अफेअरच्या अफवांवर गोविंदानी मौन तोडले

इंडियन आइडल 17:हिमेश रेशमिया सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये परतणार, निर्मात्यांनी मोठी घोषणा केली

सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमिर खानचा सन्मान होणार, या चित्रपटाला 'स्क्रीन आयकॉन' पुरस्काराने सन्मानित केले जाणार

ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

Hurun Rich List 2026: संपत्तीत लक्षणीय घट होऊनही शाहरुख खान भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता, अमिताभ बच्चन दुसऱ्या क्रमांकावर

सर्व पहा

माझ्या वैयक्तिक आयुष्याचा तमाशा करू नका," कोमल राणीसोबतच्या अफेअरच्या अफवांवर गोविंदानी मौन तोडले

इंडियन आइडल 17:हिमेश रेशमिया सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये परतणार, निर्मात्यांनी मोठी घोषणा केली

हिरवीगार जंगले, नद्या आणि धबधबे निसर्गप्रेमींचे नंदनवन ''अरुणाचल प्रदेश''

गोविंदाच्या कोमल राणीसोबतच्या संबंधांमुळे राखी सावंत ने गोविंदाला खडसावले

सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमिर खानचा सन्मान होणार, या चित्रपटाला 'स्क्रीन आयकॉन' पुरस्काराने सन्मानित केले जाणार

पुढील लेख
Show comments