सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 30 डिसेंबर 2023 (09:15 IST)

Ira Nupur wedding : इरा आणि नुपूरचे महाराष्ट्रीयन पद्धतीने होणार लग्न

Ira Khan-Nupur Shikhare
Ira Nupur wedding :अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान आणि नुपूर शिकरे ३ जानेवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांचा विवाह महाराष्ट्रीय रितीरिवाजाप्रमाणे होणार आहे. अलीकडेच, आयराने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर प्री-वेडिंग विधींचे काही फोटो शेअर केले होते. या कार्यक्रमात आमिरची माजी पत्नी किरण राव आणि मुलगा आझाद रावही दिसले. 
 
आमिर खानही त्याची पहिली पत्नी रीना दत्ताची मुलगी आयरा आणि नुपूर शिकरे यांच्या लग्नासाठी खूप उत्सुक आहे. अलीकडेच तो लग्नाची शॉपिंग करताना दिसला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयरा आणि नुपूरचा लग्नसोहळा वांद्रे येथील आलिशान ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये होणार आहे. यानंतर 6 ते 10 जानेवारी दरम्यान दिल्ली आणि जयपूरमध्ये दोन रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात येणार आहे.
 
तथापि, खान कुटुंबाकडून अद्याप याबाबत कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. नवीन वर्षामुळे इंडस्ट्रीतील बहुतांश कलाकार शहराबाहेर असल्याची चर्चा आहे. असे म्हटले जात आहे की जे स्टार्स लग्नाला उपस्थित राहू शकणार नाहीत ते या जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी रिसेप्शनला नक्कीच येतील. या खास सोहळ्याला आमिर खान खास मित्र आणि इंडस्ट्रीतील जवळच्या लोकांनाही आमंत्रित करत आहे.
 
याआधी एका मुलाखतीत आमिरने आयराच्या लग्नाची माहिती दिली होती. तो म्हणाला होता, 'मी खूप भावूक आहे भाऊ, त्या दिवशी मी खूप रडणार आहे हे निश्चित. त्यादिवशी आमिरला कसे हाताळायचे याची चर्चा कुटुंबात सुरू आहे. कारण मी खूप भावनिक आहे. मला माझे हसू आणि अश्रू आवरता येत नाहीत. उल्लेखनीय आहे की, आयरा खानने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये फिटनेस ट्रेनर बॉयफ्रेंड नुपूर शिकरेसोबत इटलीमध्ये एंगेजमेंट केली होती.
 
Edited By- Priya DIxit