रविवार, 2 एप्रिल 2023
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified सोमवार, 24 ऑगस्ट 2020 (16:40 IST)

केबीसीचे शुटिंग सुरु, बच्चन यांनी ट्विटर अकाउंटवर फोटो केले शेअर

कौन बनेगा करोडपती कार्यक्रमाचे होस्ट अमिताभ बच्चन यांनी त्याची शूटिंग सुरू केली आहे. बिग बी पुन्हा एकदा केबीसीचा १२ वा हंगाम आपल्या चाहत्यांसमोर घेऊन येच आहे. केबीसी -१२ चा पहिला प्रोमो समोर आला असून आता चाहत्यांना या कार्यक्रमाच्या प्रसारणाची प्रतीक्षा आहे. अमिताभ बच्चन यांनी कार्यक्रमाच्या शुटिंगची काही माहिती सोशल मीडियावर दिली आहे. यावेळी बच्चन यांनी असेही सांगितले आहे की, कोरोनासंदर्भात सेटवर आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.
 
अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक फोटो शेअर करत लिहिले की, “याची सुरुवात झाली आहे. मी केबीसी घेऊन पुन्हा कामावर परतलो आहे.” या व्यतिरिक्त त्यांनी शूटिंगचे फोटो आपल्या ब्लॉगवर शेअर केले आहेत, ज्यात पीपीई किट्स परिधान केलेल्या काही क्रू मेंबर्स केबीसीच्या सेटवर दिसून येत आहेत.
 
त्यांनी असेही लिहिले, ‘याची सुरुवात झाली आहे. केबीसी १२ चे वातावरण आनंददायी आहे. २००० मध्ये सुरू झालेला हा कार्यक्रम आणि आज २०२० आहे. या कार्यक्रमाची बरीच वर्षे लोटली आहेत आणि हे अकल्पनीय आहे. या कार्यक्रमाच्या सेटवर शांत, जागरूकपणे कामकाज सुरू असून सर्व खबरदारी, यंत्रणा, सामाजिक अंतर, मास्क, स्वच्छता यावर काळजी घेतली जात आहे, परंतु या भयंकर कोविड -१९ नंतर जग कशा प्रकारचे दिसेल कल्पना नाही. सेटवर मैत्रीचा अभाव आहे. कोणतीही तातडीची कामे असल्याशिवाय कोणीही बोलत नाही. हे प्रयोगशाळेसारखे दिसते, जेथे काही वैज्ञानिक प्रयोग करीत आहेत.'