1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. Actress Aishwarya rai Bachchan tested corona negative)

अमिताभ बच्चनना अश्रू अनावर

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन व तिची आठ वर्षांची मुलगी आराध्या यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. या दोघींनाही रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. आराध्या आणि ऐश्वर्याची करोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे. सोबतच त्यांना अश्रू अनावर झाल्याचं म्हटलं आहे.
 
“आमची चिमुकलीला आणि सुनबाईंना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. माझ्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीयेत. देवा तुझी कृपा आहे”, असं ट्विट बिग बींनी केलं आहे.
 
दरम्यान, ऐश्वर्या आणि आराध्याची करोना चाचणी निगेटव्हि आली आहे. मात्र अद्यापही बिग बी आणि अभिषेक बच्चनवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बिग बी व अभिषेक यांना ११ जुलै रोजी करोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. १२ जुलै रोजी ऐश्वर्या व आराध्याचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तेव्हा या दोघींनी घरातच क्वारंटाइन करण्यात आलं होतं. मात्र एका आठवड्यानंतर दोघींनाही नानावटीमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
पुढील लेख
26 जुलैच्या पुराची 15 वर्ष: अभिनेता ऋतिक रोशन एका मुलीचे प्राण वाचवून बनला खऱ्या आयुष्यातील सुपरहीरो! चाहत्यांनी जागवल्या आठवणी