1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 21 जुलै 2020 (17:52 IST)

अभिनेत्री सविता मालपेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

आणखी एक अभिनेत्री राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे सविता मालपेकर. सविता मालपेकर या आता राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ त्यांच्या हाती बांधतील. त्यांच्यासोबतच गीतकार आणि अभिनेते असेलेले बाबा सौदागर, अभिनेत्री अर्चना नेवरेकर हेदेखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हे तीन कलाकार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. 
 
सविता मालपेकर या मराठीतल्या अत्यंत प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक सिनेमा आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. मूळशी पॅटर्न, काकस्पर्श या सिनेमांमधल्या त्यांच्या भूमिका गाजल्या. तसंच गाढवाचं लग्न या नाटकातली गंगी ही भूमिकाही त्यांनी उत्तमरित्या साकारली आहे. मराठी नाटक, सिनेमा, मालिकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला आहे.