धक्कादायक : कल्याण-शीळ मार्गाच्या कडेला कचऱ्यात एक दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक सापडले
भर पावसात कल्याण-शीळ मार्गाच्या कडेला कचऱ्यात एक दिवसाचे स्त्री जातीचे A one-day-old female अर्भक टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (18 जुलै) दुपारी उघडकीस आला. शीळ डायघर पोलिसांना याविषयी माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बाळाला ताब्यात घेतले. बाळाची प्रकृती स्थिर असून त्याला नवी मुंबई येथे हलविण्यात आले आहे. याप्रकरणी अनोळखी पालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पालकांचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कल्याण शीळ मार्गावर वाहनांची सतत वर्दळ सुरु असते. शनिवारी Saturday दुपारीही रस्त्यावर वाहनांची वर्दळ होती. पावसाच्या सरीही बरसत होत्या. याचदरम्यान रस्त्यावरुन ये जा करणाऱ्या नागरिकांना रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्यातून बाळाचा रडण्याचा आवाज आला. थर्माकॉलचे अनेक बॉक्स येथे पडलेले असल्याने नागरिकांनी आवाजाचा शोध घेतला. तर एक नवजात अर्भक लाल कपड्यात गुंडाळलेले आढळून आले. याप्रकरणी शीळ-डायघर पोलिसांना तातडीने कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बाळाला ताब्यात घेतले. शनिवारी दुपारी रिव्हरवूड पार्क परिसरात कल्याण शीळ रोडवरील बाजूच्या कचऱ्यात एक नवजात स्त्री जातीचे अर्भक मिळाले आहे. हे बाळ नुकतेच जन्मलेले आहे, त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्याची प्रकृती उत्तम आहे. सध्या नवी मुंबई नेरुळ येथे त्याला हलविण्यात आले आहे. आजूबाजूच्या परिसरात बाळाच्या पालकांचा शोध घेतला जात आहे. सी. जे. जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शीळ डायघर पोलिस ठाणे.