1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified मंगळवार, 25 ऑगस्ट 2020 (08:38 IST)

उत्सुकता संपली, मिर्झापुर २ 'या' रिलीज होणार

वेब सिरीज 'मिर्झापुर' च्या दुसऱ्या सिझनची रिलीजची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 'मिर्झापुर २' २३ ऑक्टोबर २०२० रोजी रिलीज होणार आहे.
 
उत्तर भारतात असलेल्या मिर्झापुरने सिझन १ मध्ये प्रेक्षकांना बंदूक, ड्रग्स आणि राजकारणाचं एक वेगळ जग जगासमोर आणलं. पंकज त्रिपाठी, अली फझल, दिव्येंदु शर्मा, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिका दुगल, हर्षिता शेखर गौंड, अमित सियाल, अंजुमा शर्मा, शीबा चड्ढा, मनू ऋषि चड्ढा आणि राजेश तेलंग या कलाकारांच्या अभिनयाने या कलाकृतीला एक वेगळाच दर्जा प्राप्त झाला आहे. 
 
ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर 'मिर्झापुर' ही भारतात तयार झालेल्या कलाकृतींपैकी एख आहे. छोट्या शहरातील गँगस्टर आणि त्यांनी केलेल्या गुन्हांचं एक अनोखं जग या वेबसिरीजमधून मांडल आहे.