शनिवार, 1 एप्रिल 2023
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. मोबाईल
Written By
Last Modified गुरूवार, 30 एप्रिल 2020 (22:37 IST)

वनप्लस लवकरच स्वस्तातला स्मार्टफोन आणणार

वनप्लस ही स्मार्टफोन कंपनी लवकरच स्वस्तातला स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. या फोनची किंमत वनप्लस 8 आणि वनप्लस 8 प्रोपेक्षा कमी असेल. वनप्लस झेड असं या फोनला नाव दिलं आहे. कंपनी जुलैमध्ये हा फोन बाजारात आणणार आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
 
वनप्लस फ्लॅगशिपच्या लाँचिंगच्या वेळी, अनेक चाहत्यांनी अशी अपेक्षा केली होती की स्वस्त वनप्लस 8 लाइटला देखील लाँच केलं होईल. मात्र, चाहत्यांच्या पदरी निराशाच आली. 
 
वनप्लस ८ सिरीजसाठी भारतात प्री-बुकिंग  सुरू करण्यात आली आहे. ही माहिती कंपनीने दिली आहे. यात  ग्राहक वनप्लस ८ आणि वनप्लस ८ प्रो या दोन्ही मॉडेल साठी प्री-बुकिंग करू शकतात.