शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

‘टायटॅनिक’ पुन्हा एकदा २डी आणि ३ डीमध्ये

साल १९९७ मध्ये आलेल्या ‘टायटॅनिक’ २० वर्षांनंतर पुन्हा एकदा  २डी आणि ३ डीमध्ये प्रेक्षकांना हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. दोन दशकांपूर्वी आलेल्या ‘टायटॅनिक’ने सगळीकडे धूम केली होती. सर्वाधिक लोकप्रीय आणि सर्वाधिक कमाई करणा-या चित्रपटांच्या यादीत आजही हा चित्रपट आघाडीवर आहे. या चित्रपटात जॅक व रोज साकारणारा अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रियो आणि अभिनेत्री केट विन्सलेट या दोघांच्या जोडीची केमिस्ट्री आणि पडद्यावरचा त्यांचा रोमान्स प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत. 
 
रिलीजआधी ‘टायटॅनिक’चे नवा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. यात चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमरून दिसत आहे. ‘टायटॅनिक’ दुस-यांदा रिलीज होत असला तरी प्रेक्षकांना आपण हा चित्रपट पहिल्यांदाच पाहतोयं, अशी अनुभूती देणारा असेल, असे कॅमरून या ट्रेलरमध्ये सांगताहेत. डॉल्बी व्हिजनसह रिलीज करण्यात येणारा हा चित्रपट केवळ अमेरिकेत पाहता येईल. येत्या १ डिसेंबरला अमेरिकेच्या एएमआर थिएटरमध्ये एक आठवडाभर चित्रपट दाखवला जाईल. अर्थात भारतातील प्रेक्षक तो आॅनलाईन  पाहू शकतील.