रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 16 जानेवारी 2023 (21:26 IST)

Nasir Faraz Passed Away: प्रसिद्ध गीतकार नासीर यांचे निधन

प्रसिद्ध गीतकार नासिर फराज आता आपल्यात नाहीत. त्यांच्या मृत्यूच्या बातम्या येत आहेत. बॉलिवूडसाठी अनेक उत्तम गाणी लिहिणारे नासिर फराज यांना हृदयविकाराचा त्रास होता. नासिर फराज यांनी 2010 साली रिलीज झालेल्या काइट्स चित्रपटातील 'दिल क्यूँ मेरा शोर करे' आणि 'जिंदगी दो पल की' ही दोन सुपरहिट गाणी लिहिली होती. नासिर फराज यांनी बाजीराव मस्तानी, क्रिश आणि काबिल यांसारख्या चित्रपटांसाठीही गाणी लिहिली.
 
नासिर फराज यांचे मित्र आणि गायक मुजतबा अजीज नाजा यांनी नासिर फराज यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. अजीज नाजा यांनी एका मीडिया संस्थेशी संवाद साधताना सांगितले की, नासिर फराज यांना हृदयाशी संबंधित आजार होता. सात वर्षांपूर्वी त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती. रविवारी संध्याकाळी त्यांना छातीत दुखू लागले, मात्र ते रुग्णालयात गेले नाहीत. सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांचे निधन झाले. मुंबईतील नालासोपारा स्मशानभूमीत त्यांचे पार्थिव सोपवण्यात येत आहे.