suvichar
✕

'अँग्री यंग मॅन'च्या काळात पालेकर होते 'कॉमन मॅन', तरी हिट झाले

Updated: गुरूवार, 10 फेब्रुवारी 2022 (11:00 IST)
 
अमोल पालेकर पडद्यावर सामान्य माणूस दाखवायचे
साधे दिसणे, सर्वसामान्यांप्रमाणे बोलण्याची शैली आणि अभिनयासाठी त्यांनी निवडलेल्या कथाही अतिशय साध्या होत्या. त्यांचा प्रत्येक चित्रपट सर्वसामान्यांना भिडला. पालेकर साहेबांचा चित्रपट पाहून काही तरी खऱ्या आयुष्यात घडत आहे असे वाटले. कॉमन मॅनची भूमिका साकारुन देखील अमोल पालेकर प्रत्यक्षात बिग बींच्या समांतर नक्कीच उभे राहिले.
 
अमोल सामान्य माणसाची भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध होते. गोलमाल, घरौंदा, चितचोर, छोटी सी बात, बातों में, आदमी और स्त्री, रंग बरंगी, अपने पराई यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी अत्यंत साध्या व्यक्तीची भूमिका साकारली. या चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांवर आपली छाप सोडली.
 
अमोल पालेकर यांनी दिग्दर्शन क्षेत्रात सर्वाधिक नाव कमावले
अमोल पालेकर यांनी अभिनयात जेवढे नाव कमावले त्यापेक्षा जास्त दिग्दर्शन क्षेत्रात आपला ठसा उमटवला. त्यांच्या उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी त्यांना 5 वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 'आँखे' या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले. या चित्रपटात त्यांनी स्वतः अभिनेता म्हणून काम केले आहे. दायरा, रुमानी हो जाए, बांगरवाड़ी, ध्याव परवा, पहेली, क्वेस्ट, एंड वन्स अगेन आणि समानांतर चित्रपटांचाही समावेश आहे. अमोल पालेकर स्वतःबद्दल सांगतात. मी एक प्रशिक्षित चित्रकार आहे, अपघाताने अभिनेता आहे, मजबुरीने बनलेला निर्माता आहे आणि माझ्या आवडीने दिग्दर्शक आहे, असे त्यांनी एकदा सांगितले होते.
 
वयाच्या 57 व्या वर्षी लग्न झाले
अमोल पालेकर यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1944 रोजी मुंबईत झाला. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर अमोल पालेकर यांनी दोन लग्न केले होते. वयाच्या 57 व्या वर्षी त्यांनी पहिली पत्नी चित्रा पालेकर यांना घटस्फोट दिला आणि संध्या गोखले यांच्याशी लग्न केले. त्यांना दोन मुली आहेत.

सर्व पहा

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

फार्स फिल्म्स तर्फे शाहरुख खानचा 'किंग' २४ डिसेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होणार

रामायणाचे दोन नव्हे, तर तीन भाग असणार का? रणबीर कपूरने एक मोठा संकेत दिला

कोणत्याही आंदोलनात मी यापुढे सहभागी होणार नाही; 'भारत सोडा नोटीस' संदर्भात इम्रान खानने उच्च न्यायालयात माफी मागितली

ऋषभ शेट्टी शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार, भूषण कुमार यांनी 'द प्राईड ऑफ भारत' या मेगा प्रोजेक्टची घोषणा केली

सर्व पहा

दिवाळीपासून हिवाळी सुट्टीचे नियोजन करा; जैसलमेरमध्ये पाहण्यासारखी खास ठिकाणे

रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करण्याचे आदेश देणारा गुंड हॅरी बॉक्सरला अटक

मृदंगम वादक श्रीधर पार्थसारथी यांचे निधन

दिवाळीपूर्वी 'रामायण'ने विक्रम मोडले, पहिल्याच दिवशी १५५ कोटी रुपयांची कमाई केली

दिवाळीत गोव्याला जायचे आहे? बीच, खाद्यसंस्कृती आणि फिरण्याच्या ठिकाणांचा प्लॅन

पुढील लेख
Show comments