बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शनिवार, 4 मे 2019 (10:33 IST)

'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपट २४ मे रोजी प्रदर्शित होणार

अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाच्या प्रदर्शनाला मुहूर्त सापडला. हा चित्रपट लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अर्थात 24 मे राजी देशभरात प्रसिद्ध होणार आहे. या चित्रपटात मोदींचा बालपणापासून ते पंतप्रधान पदापर्यंतचा जीवनप्रवास दाखवण्यात आलाय तर मोदींची व्यक्तिरेखा बॉलिवुड अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी साकारलीय. या चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बालपणापासून ते पंतप्रधान पदापर्यंतचा जीवनप्रवास दाखविण्यात आला आहे. चित्रपटात बॉलिवुड अभिनेता विवेक ओबेरॉय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेत दिसणार आहे. सदर चित्रपट 5 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या काळात हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. चित्रपट प्रदर्शनाचे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते. चित्रपटाचे प्रदर्शन निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजे 19 मेपर्यंत न करण्याचे आदेश दिले. याविरोधात निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊनही दिलासा न मिळाल्याने शुक्रवारी प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. अखेर 24 मे रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे.