गुरूवार, 15 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 9 जून 2017 (15:09 IST)

बाहुबली प्रभासचा क्लीन शेव लुक झाला वायरल...

prabhas new look
बाहूबली चित्रपटात आपल्या जबरदस्त लूकने सर्वांवर छाप पाडणा-या प्रभासचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये प्रभास पुर्णपणे क्लीन शेव्ह दिसत आहे. बाहुबली चित्रपटातील पिळदार मिशा आणि दाढीमधील प्रभासचा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला होता. प्रभासला चित्रपटानंतर अनेक तरुणींकडून लग्नाची मागणीही घालण्यात आली होती. मात्र प्रभासचा हा नवा फोटो व्हायरल होत असून क्लीन शेव्ह लूकमुळे त्याला ओळखणंही कठीण जात आहे.

प्रभासचा त्याचा आगामी चित्रपट 'साहो'साठी हा नवा लूक ठेवला असल्याचं बोललं जात आहे. प्रभासचा हा फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवरील फॅन्स पेजवर अपलोड करण्यात आला आहे. हे प्रभासचं अधिकृत अकाऊंट नाही आहे. त्यामुळे या फोटोची सत्यता पडताळणं थोडं कठीण असून संशयास्पद आहे. फोटोमधील व्यक्ती प्रभास आहे यामध्ये कोणताच वाद नाही. पण हा नवा लूक 'साहो' चित्रपटासाठीच आहे का ? याबद्दल मात्र थोडी शंका आहे.