रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

अखेर प्रियांकाने माफी मागितली

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने चाहत्यांची माफी मागितली आहे. माफीचे कारण अमेरिकन टेलिव्हिजनवरील क्वांटिको मालिकेच्या वादग्रस्त कथन होते ज्यात हिंदुस्थानीना दहशतवादी दाखवण्यात आले. अशा मालिकेत प्रियांकाने काम केले असून भारतीयांबद्दल चुकीचे बोलले यावर चाहते संतापले होते. सोशल मिडीयात तिच्या विरोधात मोहीम उघडण्यात आली होती. अखेर प्रियांकाला या वादावर माफी मागावी लागली. प्रियांकाने माफी मागताना म्ह्टलंय, ‘क्वांटिको’मध्ये लोकांच्या भावना दुखावल्या, याबद्दल मला खूप दु:ख होत आहे. असे करण्याचा माझा हेतू नव्हता आणि कधी नसेल. मी मनापासून सगळ्यांची माफी मागतो आणि मला हिंदुस्थानी असल्याचा गर्व आहे.
 
या मालिकेत पाकिस्तानला फसवण्यासाठी हिंदुस्थान कटकारस्थान रचतो, असे दाखवण्यात आले आहे. आणि प्रियांका एफबीआय एजंटची भूमिका साकारत आहे. 
 
या डायलॉगवरून वाद निर्माण झाला
हा पाकिस्तानी नाही कारण याच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे. ही माळ कोणत्याही पाकिस्तानी मुसलमानाच्या गळ्यात नसू शकते. हा एक भारतीय राष्ट्रवादी आहे आणि तो पाकिस्तानला फसवू इच्छित आहे.