गुरूवार, 5 ऑक्टोबर 2023
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 1 एप्रिल 2023 (17:16 IST)

आईच्या सल्ल्याने प्रियंका चोप्राने एग्ज फ्रीज केले, म्हणाली- मला स्वातंत्र्य वाटले...

priyanka chopra daughter
देसी गर्ल प्रियांका चोप्राने बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची शान फडकवली आहे. अलीकडेच एका पॉडकास्ट दरम्यान प्रियंका चोप्राने तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक खुलासे केले आहेत. अमेरिकन गायक निक जोनासशी लग्न केल्यानंतर सरोगसीच्या माध्यमातून मुलगी मालतीची आई बनलेल्या प्रियांकाने तिच्या आईच्या सल्ल्यानुसार एग्ज फ्रीज केल्याचा खुलासा केला आहे.
 
डॅक्स शेफर्डसोबतच्या एका पॉडकास्टमध्ये प्रियांका चोप्रा म्हणाली, 30 व्या वर्षी मी एग्ज फ्रीज केल्याने मला मोकळे वाटले. मला माझ्या करिअरमध्ये एक विशिष्ट स्थान कोरायचे होते आणि बरेच काही साध्य करायचे होते. तसेच तोपर्यंत मला ज्या व्यक्तीसोबत मूल व्हायचे होते, ती व्यक्ती मला भेटली नव्हती. तर माझी चिंता पाहून माझी आई (मधू चोप्रा) म्हणाली, 'जस्ट डू इट'.
 
प्रियंका म्हणाली, माझ्या आईने मला हे सांगितले आणि मी स्वतःसाठी असे केले. मी माझ्या सर्व तरुण मित्रांना सांगते की बायोलॉजिकल क्लॉक खरे आहे. 35 नंतर गर्भवती होणे खूप कठीण होते. विशेषत: आयुष्यभर काम करणाऱ्या महिलांबाबत.
 
याआधी एका मुलाखतीत प्रियंका चोप्राने सरोगसीद्वारे आई होण्याचा पर्याय खुलासा केला होता. अभिनेत्रीने सांगितले होते की तिला काही वैद्यकीय गुंतागुंत होते ज्यामुळे तिला मुल जन्माला घालणे कठीण होते. यामुळे तिने सरोगसीचा पर्याय निवडला असून तिला तिच्या निर्णयाचा अभिमान आहे.