गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 8 मार्च 2018 (11:11 IST)

रजनीकांत आले सोशल मीडियावर

सुपरस्टार रजनीकांत चाहत्यांसोबत कनेक्टेड राहण्यासाठी सोशल मीडियावर आले आहेत. यापूर्वी ते केवळ ट्विटरवर होते मात्र आता फेसबूक आणि इंस्टाग्रामवरही त्यांची दमदार एन्ट्री झाली आहे. इंस्टाग्रामवर रजनीकांत यांनी एक फोटो शेअर केला आहे. रजनीकांत यांनी फोटोसोबत  'त्यांना सांगा मी आलोय' अशा स्वरूपाचे कॅप्शन लिहले आहे. तामिळ भाषेत त्याने चाहत्यांना 'नमस्कार' म्हटले आहे. रजनीकांत यांनी लिहलेली ही पोस्ट 'कबाली' या चित्रपटातील एक डायलॉग आहे. 

रजनीकांत यांना सोशलमीडियावरही तुफान फॅनफॉलोविंग आहे. फेसबुकवर अल्पावधीतच 1 लाखाहून अधिक तर इंस्टाग्रामवर 46.2k  पेक्षा अधिक फॅन फॉलोवर्स आहेत. रजनीकांत यांची दोन्ही अकाऊंट व्हेरिफाईड झाली आहेत.