बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : गुरूवार, 16 मे 2019 (16:48 IST)

कंगनाच्या बहिणीने या अभिनेत्याच्या विरोधात केली दुष्कर्माची तक्रार

अभिनेत्री कंगना राणावतच्या बहिणीने अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात दुष्कर्माची तक्रार दिली आहे. ई मेलद्वारे वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी याबाबत बोलण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे आदित्य पांचोलीने मात्र हे आरोप फेटाळले आहेत. सुमारे 13 वर्षांपूर्वीचं हे प्रकरण आहे. काही वर्षांपूर्वी कंगना आणि आदित्य पांचोली हे दोघेही रिलेशनशीपमध्ये होते.  
 
दरम्यान, आदित्य पांचोलीनेही काही दिवसांपूर्वी कंगनाविरोधात तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार त्या तक्रारीला उत्तर आहे जे दशकापूर्वी कंगना आणि तिची बहीण रंगोलीने दाखल केली होती. कंगना आणि तिच्या बहिणीने आदित्य पांचोलीविरोधात मारहाण आणि लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.
 
आदित्य पांचोलीही आता कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. कंगनाच्या वकिलाने दुष्कर्माचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप आदित्यचा आहे. त्यासाठी आदित्य पांचोलीने काही व्हिडीओ, फोन रेकॉर्डिंग पोलिसांना दिले आहेत.