शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 15 मे 2019 (15:26 IST)

इरफानच बॉलिवूडमधील सर्वात मोठा 'खान'

बॉलिवूडवर सलमान खान, शाहरुख खान व आमिर खान या तीन खानांचे राज्य आहे. या तिकडीच्या चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. अभिनेत्री करिना कपूरने या तिघांसोबतही काम केले आहे. मात्र अभिनेत्री कपूरला या तीन खानांपेक्षा दुसराच एक खान जास्त आवडत असल्याचे तिने सांगितले आहे. हा खान म्हणजे तिचा नवरा सैफ अली खानदेखील नसून तिच्या आगामी चित्रपटातील अभिनेता इरफान  खान आहे. अभिनेता इरफान खान हा बॉलिवूडमधला सर्वात मोठा खान असल्याचे तिला वाटते. करिना सध्या इरफानचा गाजलेला चित्रपट हिंदी मीडियचा सिक्वेल असलेल्या अंग्रेजी मीडियम या चित्रपटात त्याच्यासोबत काम करत आहे. यात ती एका महिला पोलिसाची भूमिका साकारत आहे. याबाबत माध्यमांनी करिनाला विचारले असता तिने इरफान खानच्या स्तुतीचे पूल बांधले. मी इरफान खान यांच्यासोबत काम करण्यास फार उत्सुक होते. बॉलिवूडमधल्या सर्व खानांसोबत मी काम केले आहे. पण इरफान खान यांच्यासोबत काम करणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. बॉलिवूडधील सर्व खानांपैकी ते सर्वात उत्त अभिनेते आहेत. माझ्यासाठी तर ते सर्वात मोठे खान आहेत. माझी या चित्रपटात छोटी भूमिका आहे. पण इरफान खान यांच्यासोबत काम करण्यासाठी मी ती स्वीकारली', असे करिनाने यावेळी सांगितले.