ganesh chaturthi

सुशांतचा शेवटचा सिनेमा सिनेमागृहातच रिलीज करा

Updated: मंगळवार, 23 जून 2020 (07:45 IST)
 
पोस्ट प्रोडक्शनचं काम बाकी असल्याचं सांगत या चित्रपटाचं प्रदर्शन बऱ्याचदा पुढे ढकलण्यात आलं होतं. सध्या चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित केले जाण्याची हवा आहे. पण, हा चित्रपट सिनेमागृहातच रिलीज करण्यात यावा अशी आग्रही मागणी करण्यात येत आहे. २०१४ साली आलेल्या हॉलिवूडच्या 'द फॉल्ट इन अवर स्टार' या चित्रपटाचा 'दिल बेचारा' हा चित्रपट रिमेक आहे. सुशांतचा ‘दिल बेचारा’(Dil Bechara)ही एक प्रेमकथा असून, त्यात संजना संघी त्याची नायिका आहे. हा चित्रपट जॉन ग्रीनच्या कादंबरीवर हा चित्रपट बेतलेला आहे.
 
सुशांतच्या आत्महत्येचं (sushant singh rajput suicide)नेमकं कारण अद्यापही समोर आलं नसलं तरी बॉलिवूडमधल्या घराणेशाहीमुळं त्याच्यावर ही वेळ आली असं त्याच्या चाहत्यांनी म्हटलं आहे.त्यामुळं त्याचा ‘दिल बेचारा' हा चित्रपच मोठ्या पडद्यावरच प्रदर्शित करण्यात यावा, 'आम्हाला आमच्या हिरोला शेवटंचं मोठ्या पडद्यावर पाहयचं आहे', असं सुशांतच्या चाहत्यांनी म्हटलं आहे. ८ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण लॉकडाउमुळं हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.
 
३४ वर्षांचा सुशांत त्याच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. नैराश्यग्रस्त अवस्थेत सुशांतनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जातंय. गेल्या सहा महिन्यांपासून सुशांत नैराश्येत होता. यावर तो उपचारही घेत होता.छोट्या पडद्यावर 'किस देश में है मेरा दिल', 'पवित्र रिश्ता' या त्याच्या मालिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यानंतर 'काय पो छे' सुशांतनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. 'शुद्ध देसी रोमान्स', 'एम एस धोनी एनटोल्ड स्टोरी', 'केदारनाथ', 'राबता', 'पिके', 'छिछोरे' या सिनेमांतून त्यानं आपली अभिनयक्षमता सिद्ध करून बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण करण्यात यश मिळवलं होतं

सर्व पहा

'६ वर्षे येरवडा जेलमध्ये राहिलो, पण...'; संजय दत्तच्या 'त्या' विधानाने महाराष्ट्रात राजकीय गदारोळ!

Bigg Boss 20: 'बिग बॉस'चा २०वा सीझन मध्ये मनोज तिवारी यांची मुलगी रीतीची एन्ट्री

'लस्ट स्टोरीज ३' ची घोषणा, या तारखेला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल

करण जोहर राधा-कृष्णाची कथा मोठ्या पडद्यावर आणणार; जाणून घ्या कोण करणार या चित्रपटाचे दिग्दर्शन

ईशा देओल विनोदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करणार! अभिनेत्री दिसणार या चित्रपटात

सर्व पहा

'हनुमान अंश' ३५ व्या दिवशीही आपली जादू कायम ठेवत या चित्रपटाने १९२ कोटी रुपयांची कमाई केली

बिपाशा बसूच्या प्रोटीन पावडरमध्ये सापडले किडे! अभिनेत्रीने एक व्हिडिओ शेअर करून एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे मदतीचे आवाहन केले

'हनुमान अंश' चित्रपटादरम्यान थिएटरमधील सीट क्रमांक ९ रिकामा का ठेवला जात आहे? यामागील रहस्य जाणून घ्या

'हनुमान अंश २' मध्ये विराट आणि अनुष्का दिसणार? नीम करोली बाबांवर आधारित चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल मोठा संकेत

आंध्र प्रदेशातील कानिपकम मंदिरात गणपती बाप्पा विहिरीतून प्रकट झाले; गणेशोत्सव पर्वात दर्शन घेणे शुभ

पुढील लेख
Show comments