शुक्रवार, 20 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2024 (09:16 IST)

सलमान खानला मिळाली धमकी-तुझे बाबा सिद्दीकीपेक्षा वाईट हाल करू, मागितले 5 कोटी

Salman
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. यावेळी मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर धमकीचा संदेश आल्याची बातमी आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी मिळाली आहे. तसेच मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर धमकीचा मेसेज आला आहे, ज्यामध्ये अभिनेता सलमान खानकडून लॉरेन्स बिश्नोईसोबतचे वैर संपवण्यासाठी 5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. याला हलक्यात घेऊ नका अन्यथा सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षा खूपच वाईट होईल, असे या धमकीच्या संदेशात लिहले आहे.   

तसेच 17 ऑक्टोबर रोजी बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या सदस्याला अटक केली.