शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018 (00:08 IST)

सावत्र आईच्या भावाशी लग्न करायचे आहे सारा अली खानला

नुकतेच कॉफी विद करण सीझन 6चा नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यात सैफ अली खान आणि त्याची मुलगी सारा अली खान दोघेही दिसले. अस प्रथमच झाले आहे जेव्हा बाप आणि लेक एखाद्या चॅट शोमध्ये सोबत दिसले. शोमध्ये दोघेही बरेच महत्त्वाचे खुलासे करणार आहे, जे आपल्याला प्रोमोद्वारे कळून आले असेलच. या शोमध्ये साराने फारच महत्त्वाची बाब म्हटली. साराने करण जोहरच्या एका प्रश्नाच्या उत्तरात म्हटले की तिला रणबीर कपूरशी लग्न करायचे आहे.   
 
साराच्या सावत्र आईचा भाऊ आहे रणबीर कपूर...
साराचे हे विधान चर्चेत येण्याचे मुख्य कारण म्हणजे रणबीर तिची सावत्र आई करीना कपूरचा भाऊ आहे. साराचे वडील सैफ आणि शोचा होस्ट करण जौहर देखील साराची ही बाब ऐकून हैराण झाले. आता बघायचे म्हणजे ह्या सर्व प्रकरणात रणबीरची गर्लफ्रेंड आलिया भट्ट कसे रीऍक्ट करते.