शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दसरा
Written By

विजयादशमीला चुकून नका करू हे 7 काम

विजयादशमी हा शुभ मुहूर्त असला तरी या विशेष दिवशी विवाह करण्याचा विचार चुकून करू नये.
 
या दिवशी कोणत्याही पाप कर्मात भागीदार होऊ नये. याचा दुप्पट वाईट परिणाम भोगावा लागू शकतो.
 
निर्बल किंवा दुर्बल व्यक्तीवर आपल्या ताकद किंवा पदाचा जोर दाखवू नये.
 
आपल्या स्वार्थासाठी दुसर्‍यांना नुकसान होत असलेले कार्य करणे टाळावे.
 
या दिवशी वृक्ष कापणे अशुभ आहे. असे करणे आरोग्यासाठी अशुभ ठरेल.
 
महिलेवर हात उचलणे कधीही चुकीचे आहे तरी या दिवशी मुलगी किंवा स्त्रीवर प्रहार केल्याने देवी अप्रसन्न होते.
या दिवशी चुकूनही जीव हत्या करू नये.