सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दसरा
Written By

कोट्यधीश व्हायचे असल्यास दसर्‍याला करा नारळाचे हे 9 उपाय

हिंदू धर्मात कोणत्याही धार्मिक कार्यात नारळाचे अत्यंत महत्त्व आहे. नारळाला श्रीफळ असेही म्हणतात परंतू दसर्‍याला नारळाचे काही उपाय केल्याने आर्थिक समृद्धी लाभते हे माहीत आहे का? तर चला दसर्‍याच्या निमित्ताने आपण जाणून घ्या सोपे उपाय आणि समृद्ध व्हा:
 
ऋण चुकवण्यासाठी: दसर्‍याच्या दिवशी आपल्या लांबीनुसार काळा दोरा घ्यावा आणि नारळावर गुंडाळावा. याचे पूजन करून वाहत्या पाण्यात सोडून द्यावा. आणि देवाकडे ऋण मुक्तीची प्रार्थना करावी.
 
व्यवसायात लाभासाठी: दसर्‍याला एक नारळ सव्वा मीटर पिवळ्या कापड्यात गुंडाळून एक जोडी जानवं, सव्वा पाव मिठाईसोबत एखाद्या रामाच्या मंदिरात अर्पित करावे.
 
जर पैसा टिकत नसेल: एक नारळ, एक गुलाब, कमळाच्या फुलांची माळ, सव्वा मीटर गुलाबी व पांढरा कापडा, सव्वा पाव चमेली, दही, पांढरी मिठाई, एका जानवेसह देवीला अर्पित करावे. नंतर कापूर आणि शुद्ध तुपाच्या दिव्याने आरती करावी व कनकधारा स्रोत जप करावा. आर्थिक समस्या सुटतील.
 
शनी दोष दूर करण्यासाठी: दसर्‍याला नारळ काळ्या कपड्यात गुंडाळावे. 100 ग्राम काळे तीळ, 100 ग्राम उडदाची डाळ आणि 1 खिळा वाहत्या पाण्यात प्रवाहित करून द्यावे. असे केल्याने भीती दूर होते. बाधा दूर होते आणि कामातील अडथळे दूर  होतात.
 
आजारापासून मुक्ती साठी: एक नारळ आजारी व्यक्तीवरून 21 वेळा ओवाळून रावण दहनाच्या आगीत टाकून द्यावे. कोणी आजारी नसलं तरी कुटुंबाच्या आरोग्यासाठी घरातील सर्व सदस्यांवरून ओवाळून दहनात टाकू शकता.
 
संकटापासून मुक्तीसाठी: दसर्‍याच्या एका दिवसापूर्वी नारळ घेऊन झोपताना स्वत:च्या डोक्याजवळ ठेवावे. सकाळी नदीत प्रवाहित करावे. प्रवाहित करताना ॐ रामदूताय नम: मंत्राचा जप करवा.
 
श्रीगणेश व धनाची देवी महालक्ष्मीची पूजा करावी. पूजेत एक नारळ ठेवावे. पूजा झाल्यावर नारळ तिजोरीत ठेवावे. रात्री नारळ तिजोरीतून काढून रामाच्या मंदिरात अर्पित करावे. याने निर्धनता दूर करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी.
 
यश मिळवण्यासाठी लाल सुती कापड घ्यावं आणि त्यात नारळ गुंडाळून घ्यावं. नंतर वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे. नारळ प्रवाहित करताना सात वेळा आपली इच्छित कामना पूर्ण व्हावी याची प्रार्थना करावी.
 
आविष्यभर भरभराटी राहावी यासाठी दसर्‍याला गणपती आणि महालक्ष्मीची विधी विधानाने पूजा करावी. तांदळावर तांब्याचा कळश्या ठेवून एका लाल कपड्यात नारळ गुंडाळावा कळशात या प्रकारे ठेवावा की त्याचा पुढील भाग दिसावा. हा कळश्या वरुणदेवाचा प्रतीक आहे. आता दोन मोठे दिवा लावावे. एक तुपाचा तर दुसरा तेलाचा असावा. एक दिवा गणपती आणि महालक्ष्मी विराजमान असलेल्या चौरंगाच्या डावी कडे तर दुसरा मुरत्याच्या चरणी ठेवावा. या व्यतिरिक्त एक लहान दिवा गणपतीजवळ ठेवावा. नंतर पूजा करावी.