दसरा: शुभ मुहूर्तावर हे काम नक्की करा
या दिवशी नवीन कार्य आरंभ करणे शुभ ठरतं.
वाहन, दागिने आणि इतर सामान खरेदी करणे शुभ मानले गेले आहे, याने घरात भरभराटी येते.
या दिवशी महादेवाची पूजा करावी.
दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे.
या दिवशी दाराला तोरण म्हणून तसेच यंत्र, वाहने इतर वस्तूंना फुलांच्या माळा घालतात.
ज्ञानाची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दिवशी विशेषत्वाने केले जाते.
या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, सरस्वती पूजन, अपराजिता पूजन आणि शस्त्रपूजन केले जाते.
बहीखात्यांची पूजा करावी.
दिवाळीसाठी नवीन खाते या दिवशी घेता येतील.
मुलांच्या अभ्यासाच्या वही-पुस्तकांची पूजा करावी.
या दिवशी सोने म्हणून आपट्याची पाने देऊन मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा.