सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दसरा
Written By

रावण दहन झाल्यावर हे करा, सर्व अडथळे दूर होतील

दसर्‍याला नीलकंठ पक्ष्याचे दर्शन शुभ मानले गेले आहे. या दिवशी पक्षी दिसल्यास वर्ष सुखात जातात.
रावण दहन झाल्यावर उरलेलं लाकूड मिळाले तर घरी आणून सुरक्षित जागेवर ठेवावे. याने नकारात्मक घरात प्रवेश करत नाही.
 
दसर्‍याच्या दिवशी लाल रंगाचे नवीन वस्त्र किंवा रुमालाने दुर्गा देवीचे पाय पुसून वस्त्र तिजोरीत ठेवावे. घरात बरकत येते.
 
दसर्‍याला देवी प्रवास करते म्हणून या दिवशी प्रवास करणे शुभ मानले गेले आहे. या दिवशी प्रवास केल्याने सर्व अडथळे दूर होतात. परदेशी प्रवासाची इच्छा बाळगणार्‍यांनी या दिवशी लहानच का नसो पण प्रवास करणे फायदेशीर ठरेल.
 
दसरा ते शरद पौर्णिमा पर्यंत चंद्र किरणे अमृत समान असतात. म्हणून दसरा ते शरद पौर्णिमेपर्यंत रात्री 15 मिनिट चंद्राकडे त्राटक बघावे. याने डोळ्यासंबंधी आजार दूर होतात आणि ज्योत तेज होते.
 
या दिवशी शमीच्या झाडाखाली दिवा लावल्याने प्रत्येक कार्यात विजय प्राप्त होते. शत्रू भय नसून आरोग्य आणि धनाची प्राप्ती होते.
 
या दिवशी जीवनात शुभता, यश मिळवण्यासाठी आपल्या घरात किंवा एखाद्या मंदिरात लाल झेंडा लावावा.