शाहरुख खानच्या या चित्रपटाचा टीझर १५ जूनला ईदच्या औचित्याने रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर कॅटरीना कैफच्या चित्रपटातील नवा लुक तिच्या वाढदिवसादिवशी १७ जुलैला रिव्हिल करण्यात आलं होतं. झिरोमध्ये शाहरुख खानसोबत अनुष्का शर्मा आणि कॅटरीना कैफ दिसणार आहेत. हा चित्रपट २१ डिसेंबरला रिलीज होणार आहे.