गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

तृतीयपंथीयाच्या रूपात शक्ती कपूर

शक्ती कपूर यांनी वि‍विध चित्रपटांमध्ये आजवर अनेक भ‍ूमिका साकारल्या आहेत. खलनायकी भूमिकांपासून ते अगदी विनोदी भूमिकांपर्यंत प्रत्येक व्यक्तीरेखा आपल्या अनोख्या अभिनय शैलीने प्रेक्षकांसमोर जिवंत करणारे शक्ती कपूर आता एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांची ही भूमिका जितकी वेगळी आहे तितकीच आव्हानात्मकही आहे.
 
आगामी रक्तधार या चित्रपटातून ते तृतीयपंथीयाची भूमिका साकारत असून या भूमिकेद्वारे एका महत्वाच्या मुद्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. तृतीयपंथीयाची भूमिका रूपेरी पडद्यावर साकारण्याच्या अनुभवाविषयी सांगताना शक्ती यांनी एक इच्छाही व्यक्त केली. तृतीयपंथी समुदायाला एक दिवस समान वागणूक मिळेल असे त्यांचे म्हणणे आहे. समजातील एक अविभाज्य घटक म्हणून तृतीयपंथीयांकडे पाहिले जाते पण, बर्‍याच ठिकाणी त्यांना समान हक्कांपासून वंचित राहावे लागते.