1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified शनिवार, 4 सप्टेंबर 2021 (09:49 IST)

सिद्धार्थ -शहनाज :त्या रात्री काय घडलं ?जाणून घ्या

सिद्धार्थ शुक्ला यांचे वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी हृदयाच्या झटक्याने निधन झाले.त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टी आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.त्यांचे मित्र वर्ग या घटनेमुळे स्तब्ध झाले आहे.त्यांच्या कडे बोलायला काही शब्दच नाही.त्यांची मैत्रीण शहनाजची अवस्था तर अत्यंत वाईट आहे.सिद्धार्थवर काल दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या आईने त्यांना मुखाग्नी दिली.अखेर मृत्यू झाली त्या रात्री काय घडले जाणून घ्या.
शहनाज सिद्धार्थ आणि त्याच्या आईसोबत बराच काळ राहत होती.रात्री  3:30 च्या सुमारास सिद्धार्थला काही अस्वस्थता जाणवली तेव्हा त्याने शहनाज आणि त्याच्या आईला याबद्दल सांगितले. त्याच्या आईने त्याला पाणी दिले आणि मग सिद्धार्थ शहनाजच्या मांडीवर झोपला.

यानंतर शहनाजही झोपली. शहनाज सकाळी उठली तेव्हा तिने सिद्धार्थला उठवण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या शरीरात काहीच हालचाल नव्हती. सिद्धार्थची आई आणि त्याने खूप उठवण्याचा प्रयत्न केला पण तो उठला नाही. त्याच्या आईने सिद्धार्थची बहीण आणि डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी घरी येऊन सिद्धार्थला मृत घोषित केले. त्यानंतर सिद्धार्थला रुग्णालयात नेण्यात आले जेथे त्याला 10.30 वाजता मृत घोषित करण्यात आले.