1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023 (15:28 IST)

या कॉमेडियनने The Kapil Sharma Show सोडला

टीव्ही जगतातील लोकप्रिय कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो' मधील कॉमेडियन कपिल शर्मा त्याच्या संपूर्ण टीमसह लोकांना हसवत आहे. पण हा शो जितका लोकप्रिय आहे तितकेच त्याच्याशी निगडित वादही वाढले आहेत. कधी कपिल शर्मासोबत शोमधील स्पर्धकांमध्ये झालेल्या भांडणामुळे तर कधी शोमधून कलाकार निघून गेल्याने हा शो चर्चेत राहतो. आजही या शोबाबत अशीच एक बातमी येत आहे, त्यानुसार या शो संबंधित एका कलाकाराने 'द कपिल शर्मा शो'ला सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
 
सिद्धार्थ सागर या शोमध्ये 'सेल्फी मौसी', 'उस्ताद घर छोड दास', 'फनवीर सिंग' आणि 'सागर पगलेतू' यांसारख्या वेगवेगळ्या भूमिका साकारून लोकांचे मनोरंजन करत असतो. कॉमेडियनच्या कॉमेडीवर लोक खूप हसायचे, पण आता त्याचा प्रवास इथेच संपलेला दिसतोय. मात्र,सिद्धार्थ सागर यांनी या वृत्तांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही आणि त्यांनी प्रतिक्रिया देण्यासही नकार दिला आहे. सिद्धार्थने एक निवेदन जारी केले आहे की, 'मी सध्या याविषयी काहीही बोलू शकत नाही कारण माझी सध्या निर्मात्यांशी चर्चा सुरू आहे.'
 
उल्लेखीनय आहे की सिद्धार्थ सागरच्या आधीही अनेक कलाकारांनी हा शो सोडला आहे. यामध्ये कृष्णा अभिषेक, चंदन प्रभाकर या विनोदी कलाकारांच्या नावांचा समावेश आहे. कृष्णा अभिषेकने खुलासा केला होता की निर्माते आणि त्याच्यामध्ये पैशाच्या मुद्द्यावरून भांडण झाले होते. खरं तर निर्माते त्याला अपेक्षित किंमत देऊ शकत नव्हते. कृष्णा अभिषेकने असेही सांगितले होते की त्यांना शोमधील लोकांशी किंवा कपिल शर्मासोबत कोणतीही अडचण नाही.