'म्हणून' असा फोटो शेअर केला
अभिनेत्री अदा शर्मा हिने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला होता. त्यात तिला मिश्या असल्याचं दिसतंय. त्या फोटोखाली तिने मी स्वप्नांमधला पुरुष असल्याचंही म्हटलं आहे. पण, तिने या कॅप्शनमधून तिच्या आगामी चित्रपटाची माहिती दिली आहे.
मॅन टू मॅन असं तिच्या या चित्रपटाचं नाव असून त्यात ती ट्रान्सजेंडर व्यक्तीची भूमिका करताना दिसणार आहे. ही एक प्रेमकथा असणार असून अद्याप तिच्या नायकाची घोषणा झालेली नाही.