रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 4 मे 2019 (10:01 IST)

माझ्या नागरिकत्वाबाबत एवढी रुची का ?

अभिनेता अक्षय कुमारने कॅनडाच्या नागरिकत्वाबाबत मौन सोडले आहे. अक्षयने आपल्या ट्विटर हँडलवरुन अक्षयने ट्विट करुन याबाबत खुलासा केला. ''माझ्या नागरिकत्वाबाबत एवढी रुची का दाखवली जात आहे. त्यावरुन विनाकारण नकारात्म संदेश का फिरवले जात आहेत. मी माझ्या कॅनडाच्या नागरिकत्वाबाबत कधीही लपवा-छपवी केली नाही. माझ्याजवळ कॅनडाचा पासपोर्टही आहे. तसेच, हेही सत्य आहे की, मी गेल्या सात वर्षात एकदाही कॅनडाला गेलो नाही. मी भारतात काम करतो आणि भारतातच टॅक्स भरतो,'' असे ट्विट अक्षयने केले आहे. तसेच याच काळात माझ्या देशावर माझे किती प्रेम आहे, हे सिद्ध करुन दाखवायची गरज मला कधीही पडली नाही. मात्र या कमेंटमुळे मी निराश झाल्याचं अक्षयने म्हटले आहे.