बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 28 मे 2020 (22:14 IST)

काय म्हणता, 'हा' विडीओ तब्बल एक अब्ज वेळा बघितला गेला

टी सीरिज हे युट्यूबवरील सर्वाधिक लोकप्रिय भारतीय चॅनेलपैकी एक आहे. ९ मे २०११ साली या चॅनेलवर ‘हनुमान चालिसा’चा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. आश्चर्याची बाब म्हणजे गेल्या नऊ वर्षात हा व्हिडीओ तब्बल एक अब्ज वेळा पाहिला गेला आहे. असा विक्रम करणारा हा भारतातील पहिला युट्यूब व्हिडीओ आहे. 
 
भूषण कुमार यांनी ट्विट करुन ही माहिती चाहत्यांना दिली. “टी सीरिजच्या कुटुंबियांसाठी ही आनंदाची बातमी आहे. आपल्या हनुमान चालिसाच्या व्हिडीओला एक अब्ज व्हूज मिळाले आहेत. बाबा तुम्ही असाच आशिर्वाद आम्हाला देत राहा जेणेकरुन आणखी मोठे विक्रम आम्ही प्रस्थापित करत राहू.” अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.