रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 मार्च 2023 (21:27 IST)

‘तू झूठी मैं मक्कार’ने दोन दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर व अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत असलेला ‘तू झुठी मैं मक्कार’ हा चित्रपट ८ मार्चला प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू होती. या चित्रपटातील गाण्यांनाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच स्क्रीन शेअर केलेल्या रणबीर व श्रद्धाची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते.
 
रणबीर व श्रद्धाच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशी १५. ७३ कोटींचा गल्ला जमवला. होळी आणि धुळवडीच्या सुट्ट्यांमुळे या चित्रपटाला फायदा झाल्याचं दिसून आलं. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०.३४ कोटींची कमाई केली. पहिल्या दोनच दिवसांत रणबीर-श्रद्धाच्या चित्रपटाने २६.०७ कोटींची कमाई केली आहे. वीकेएण्डला हा आकडा आणखी कमाई करण्याची अपेक्षा वर्तविण्यात आली आहे


Edited By- Ratnadeep Ranshoor.