रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. बजेट 2019-20
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 30 जानेवारी 2019 (14:49 IST)

अंतरिम अर्थसंकल्पात सोने बचत योजना?

येत्या शुक्रवारी (1फेब्रुवारी) मांडण्यात येणार्‍या अंतरिम अर्थसंकल्पात सोन्याच्या खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे नव्या घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे. एका अहवालानुसार सरकारतर्फे   अंतरिम अर्थसंकल्पात बहुचर्चित सोने बचत योजना खाते (गोल्ड सेव्हिंग अकाउंट) मांडण्याची तयारी करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत सर्वसामान्य गुंतवणूकदार या खात्यामध्ये रोख रक्कम जमा करतील. त्यानंतर बँक या रोख रकमे इतके सोने खात्यात जमा करील.